Download App

World Cup 2023 : पाकिस्तानचे वर्ल्डकपमधून पॅकअप ! विजयी इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीट

  • Written By: Last Updated:

England vs Pakistan: कोलकात्यातील इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केलाय. याच बरोबर पाकिस्तानचे वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्नही भंगले आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) इंग्लंडचा तब्बल 287 धावांनी पराभव करायचा होता. परंतु पाकिस्तानला संघ या सामन्यात 287 ही धावा करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने (England) 9 विकेट्सच्या बदल्यात 337 धावांवर मजल मारली होती. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 244 धावांत गारद झाला. या सामन्यात पाकिस्तान तब्बल 93 धावांनी पराभूत झाला आहे. या विजयासह इंग्लंडने चॅम्पियन ट्रॉफीचे 2025 साठी तिकीट मिळविले आहे.


Uddhav Thackeray : ‘अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की’.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

इंग्लंडकडून तीन फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकविली. बेन स्टोक्सने 76 चेंडूत 84 धावा कुटल्या. तर जॉनी बेयरस्टोने 61 चेंडूंत 59 धावा केल्या आहेत. जो रुटनेही सावध खेळी केली. त्याने 72 चेंडू खेळत 60 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रउफने तीन, तर शाहीन आफ्रिदी व मोहम्मद वसीमने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तान वेगवान गोलंदाजांना आफ्रिकेच्या फंलदाजांना झटपट बाद करता आले नाहीत. त्यामुळे आफ्रिकेने तीनशेपेक्षा जास्त धावसंख्या उभारली. आफ्रिकेने दिलेले लक्ष्य पाकिस्तानला 6. 4 षटकांत गाठायचे होते. परंतु हे अशक्यच होते. या सामना जिंकून वर्ल्डकपचा निरोप घेण्यातही पाकिस्तान संघ अपयशी ठरला.

भारत-न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेत सेमीफायनलचे युद्ध : फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

इंग्लंडने सावध सुरूवात केली होती. 40 षटकांत 2 बाद 240 धावा झाल्या होत्या. परंतु शेवटच्या दहा षटकांत आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफानी खेळी करत 97 धावा कुटल्या. यात आफ्रिकेचे सात फलंदाजही बाद झाले. शाहिन आफ्रिदीने स्टोक्सला बोल्ड करत त्याचे शतक होऊ दिले नाही. स्टोक्सने रुटबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 132 धावांची महत्त्वाची भागिदारी केली. त्यापूर्वी बेयरस्टो आणि डेविड मलानने पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी करत चांगली सुरुवात केली होती.

पाकिस्तानचे फलंदाज फेल
या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज सपेशल अपयशी ठरले. सलामीवीर अब्दुल्ला शफीकही दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर फखर हाही एक धावेवर तंबूत परतला. कर्णधार बाबर आझमने 38 आणि मोहम्मद रिझवानने 36 धावांची खेळी केली. दोघे मोठी खेळी करू शकले नाही. सउद शकीलने 29 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानचे नऊ फलंदाज 191 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर मोहम्मद वसीम आणि हारिस रऊफने जोरदार फटकेबाजी करत 53 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानचा संघ 44 व्या षटकांत ऑलआउट झाला.

follow us