Download App

World Cup 2023 : टीम इंडियासाठी थोडी खुशी, थोडा गम; बांग्लादेशला हरवूनही फायदा नाहीच

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल टीम इंडियाने (World Cup 2023) बांग्लादेशचा दणदणीत पराभव करत सलग चौथा (IND vs BAN) विजय साकारला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी टीम इंडियासाठी (Team India) मात्र थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विजयाचा टीम इंडियाला गुणतालिकेत फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला खरा पण, नेट रनरेटमध्ये जास्त सुधारणा झाली नाही. हा सामना जिंकल्यानंतर भारताचा रनरेट +1.659 असा झाला आणि दोन्ही संघांचे अंक प्रत्येकी 8-8 असे झाले. रनरेट जास्त असल्यामुळे न्यूझीलँड प्रथम क्रमांकावर कायम राहिला.

Ind vs Ban: विराट कोहलीने सचिन तेंडुलकराचा आणखी एक विक्रम मोडला !

यानंतर आता रविवारी भारताचा सामना न्यूझीलँडशी होणार आहे. या दोन्ही संघांनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यावेळी भारत आणि न्यूझीलँडचे गुण सारखेच होते. न्यूझीलँडने अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा रनरेट सुधारला. चार सामन्यात विजय मिळवून +1.923 या रनरेटसह पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी भारताला बांग्लादेशविरुद्ध चांगल्या रनरेटने विजय मिळवणे गरजेचे होते. भारताने हा सामना जिंकलाही मात्र रनरेटमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. या सामन्यानंतर भारताचा रनरेट +1.659 असा राहिला आणि दोन्ही संघांच गुण 8-8 असे झाले. भारतापेक्षा न्यूझीलँडचा रनरेट चांगला असल्याने हा संघ प्रथम क्रमांकावर कायम राहिला.

भारताचा बांग्लादेशवर विराट विजय 

टीम इंडियाने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकात भारताचा हा सलग चौथा विजय आहे. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात दिली. रोहित शर्माने 48 आणि शुभमन गिलने 53 धावा केल्या. यानंतर आलेल्या विराट कोहलीने 103 धावांच्या नाबाद शतकाने भारतीय संघाला सलग चौथा विजय मिळवून दिला. विराटने 97 चेंडूत 103 धावा केल्या. या शतकात 6 चौकार तर 4 षटकारांचा समावेश आहे. कोहलीने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतक झळकावले. तो सचिन तेंडूलकराच्या सर्वाधिक 49 शतकांच्या रेकॉर्डपासून केवळ एक शतक दूर आहे.

World Cup 2023 : भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय; कोहलीने वनडेमधील 48 वे शतक ठोकले

Tags

follow us