चेन्नईत भारतीय फिरकीपटूंचा जलवा, दीडशे धावांवर ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा पाचवा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 36 षटकांत 7 विकेट गमावून 140 धावा केल्या आहे. ग्लेन मॅक्सवेल 15 धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीन 8 धावांवर बाद झाला आहे. जडेजाने भारताकडून 3 बळी घेतले आहेत तर कुलदीप […]

World Cup 2023

World Cup 2023

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा पाचवा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 36 षटकांत 7 विकेट गमावून 140 धावा केल्या आहे. ग्लेन मॅक्सवेल 15 धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीन 8 धावांवर बाद झाला आहे. जडेजाने भारताकडून 3 बळी घेतले आहेत तर कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या आहेत. अश्विने 1 विकेट घेतली आहे.

तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. बुमराहने मार्शला (0) बाद केले. यानंतर वॉर्नर आणि स्मिथने डावाची धुरा सांभाळली. कुलदीप यादवच्या चेंडूवर वॉर्नर 41 धावांवर बाद झाला.

अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो

डेव्हिड वॉर्नर 41 धावांवर बाद झाला, मिचेल मार्शला खातेही उघडता आले नाही. स्टीव्हन स्मिथ 46 धावांचे योगदान देऊ शकला. मार्नस लॅबुशेन 27 धावांवर तंबूत परतला, मॅक्सवेल फक्त 15 धावांचे योगदा देऊ शकला, अॅलेक्स कॅरीला खातेही उघडला आले नाही, कॅमरॉन ग्रीनने 8 धावांचे योगदान दिले. आतापर्यत ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद झाले आहे.

Video : हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत

भारताकडून जडेजाने 3 बळी घेतले आहेत तर कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या आहेत. अश्विने 1 विकेट घेतली आहे. बुमराहने 1 विकेट घेतली आहे. सिराज आणि पांड्या विकेटच्या प्रतिक्षेत आहेत.

Exit mobile version