SA vs NZ: आज विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे मैदान नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टीचा मूड असाच असणार आहे.
पुण्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल दिसते. वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. खेळपट्टीवर चांगली उसळी आहे, स्विंग देखील मिळू शकतो. पुण्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे, त्यामुळे पावसाची शक्यता नाही. म्हणजे नंतर संघाच्या गोलंदाजीला फारशा अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने सहज विजय मिळवला असला तरी अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल.
या विश्वचषकाचे दोन सामने पुण्यात झाले. दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. अफगाणिस्तान श्रीलंकेविरुद्ध 241 धावांत सर्वबाद झाला आणि बांग्लादेशलाही भारताविरुद्ध केवळ 256 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात दोन्ही लक्ष्य 3-3 गडी गमावून अगदी सहज गाठले. या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही चांगल्या विकेट मिळाल्या.
काँग्रेसची 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, राष्ट्रीय नेत्यांना उतरवले विधानसभेच्या मैदानात
पुण्याच्या मैदानाचे खास आकडे
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत 9 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर पाच वेळा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे. या खेळपट्टीवर या 9 सामन्यांच्या 8 डावात 300+ धावा झाल्या आहेत. येथे सर्वोच्च स्कोअर 356 आहे. किमान स्कोअर 230 आहे. येथील विकेट फलंदाजीसाठी खूप उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगले यश मिळाले आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-7 गोलंदाजांमध्ये एकही फिरकी गोलंदाज नाही. बुमराह आणि भुवनेश्वरसारख्या वेगवान गोलंदाजांनी येथे 10-10 बळी घेतले आहेत. या मैदानावर गेल्या सामन्यात फजलहक फारुकीने अवघ्या 34 धावांत 4 बळी घेतले होते.