World Cup 2023 : आगामी काळात विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारत- पाकिस्तानचा सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाकडून रडीचा डाव सुरू झाला असून, स्पर्धेसाठी भारतात दाखल होण्यापूर्वीच पाकिस्तानी संघाकडून आयसीसीकडे सुरक्षेची हमी मागण्यात आली आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेची स्थिती बघता आयसीसीकडे अशा प्रकारे हमी मागणे हास्यास्पद वाटते.
निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले
पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही. याचमुळे इतर संघ गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानात खेळण्यास तयार नाहीत. असे असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहे. स्पर्धेपूर्वी पाक बोर्डाकडून आतापर्यंत अनेक मागण्या केल्या आहे. परंतु, अद्यापपर्यंत आयसीसीने पीसीबीची कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाही.
आयसीसीकडून मागितली सुरक्षेची हमी
अन्य मागण्या पूर्ण होत नाही तोच आता पाकिस्तान सरकारने आणि पीसीबीने भारतात खेळताना त्यांच्या संघाच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयसीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. भारतात होणाऱ्या 2023 च्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने अद्याप संघाला परवानगी दिलेली नाही.
https://letsupp.com/sports/west-indies-caption-rovman-powell-story-how-he-faces-situation-in-his-life-74978.html
भारतात खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानी संघाला मान्यता देण्यासाठी सरकारने १५ सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आणि पीसीबीने आता भारतातील त्यांच्या संघाच्या सुरक्षेबाबत आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयसीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी पीसीबीने सुरक्षेचे कारण देत स्थळ बदलण्याची मागणी केली होती, तीही फेटाळण्यात आली होती.
आयसीसीला पाठवलेल्या पत्रात पाकिस्तान सरकार आणि पीसीबीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सध्याची परिस्थिती आणि तणाव पाहता पाकिस्तानी संघ आणि भारतातील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी त्यांना आयसीसीकडून लेखी आश्वासन हवे आहे.आशिया चषक खेळण्यासाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता, त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. तेव्हापासून पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत अडथळा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
भारत-पाकिस्तानच्या सामन्याच्या तारखा बदलणार
विश्वचषकासंदर्भात आयसीसीने जारी केलेल्या अधिकृत वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणारा सामना १४ तारखेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. याशिवाय वेळापत्रकात अन्य काही बदल होऊ शकतात, ज्यामध्ये पाकिस्तानच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांच्या तारखेत बदल होण्याची चर्चा आहे.