नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

Supriya Sule on BJP : भाजपकडून (BJP) आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच पुढे केला जातो. मला ते मान्य आहे. कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. मी प्रतिभा शरद पवार यांची कन्या असल्याचा मला अभिमान आहे. पण, एनडीएत (NDA) घराणेशाहीचं मेरीट सांगणारे नेते नाहीत का? राष्ट्रवादीला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सत्तेत का घेतलं? असा सवाल विचारत खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर टीका केली. (supriya sule on bjp ncp is naturally corrupt party then why did ncp come to power in maharashtra)

संसदेत आज सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या. यावेळी त्यांनी घराणेशाही आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील सत्तेवर आक्रमक भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, आज मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत असाल तर एनडीएची बैठक जेव्हा होते, तेव्हा जी. के वासन, चिराग पासवान, प्रफुल्ल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सर्व घराणेशाहीचं मेरिट सांगणारे नाहीत का? तुमच्या बरोबर असेल तर मेरिट आणि आम्ही जर बरोबर असलो तर तर घराणेशाही असं कसं चालणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना 

त्या म्हणाल्या, भाजपा खासदार-आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणता झाली तरीही चालतं. मात्र, आम्ही आलो तर घराणेशाही असते. माझ्या लोकसभा मतदारसंघात आलेले भाजपचे दिग्गज नेते काय म्हणाले? राष्ट्रवादी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी आहे. आता मला त्यांच्याकडून स्पष्टीकरण हवे आहे की महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता कशी काय आली? आम्ही तुमच्यासोबत आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर आम्ही वाईट, असं मुळीचं नसतं, अशा शब्दात त्यांनी ठणकावलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 2014 आणि 2019 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आणि आम्ही विजयी झालो, याचा डंका वाजवला जातो. मग अरविंद केजरीवाल यांना एक नियम आणि केंद्राला एक नियम का?. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आहे तर तो चुकीचा आणि भाजपला दिला तो बरोबर हा कुठला न्याय आहे, असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी संसदेत विचारला. अरविंद केजरीवाल यांना लोकशाही मार्गाने दिल्ली आणि पंजाबच्या निवडणुका जिंकता आल्या हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

4 वर्षानंतरही दिल्लीत निवडणुका झाल्या नाहीत. यावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, जम्मू आणि काश्मीर हे एक राष्ट्र होते पण तुम्ही त्याचे तीन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले. यानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, वर्षभरात तेथे निवडणुका होतील. आज 4 वर्षे झाली आणि तिथे एकही निवडणूक झाली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचे की अजून काय? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube