World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाला काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताविरुद्ध खेळताना नसीम शाहला दुखापत झाली होती. यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा सुपर 4 सामनाही खेळू शकला नाही. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे.
नसीम शाहची दुखापत गंभीर
नसीम शाहच्या स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या खांद्याला झालेली दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचे समोर आले आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, नसीम शाह याच्या खांद्याचे स्कॅन दुबईमध्ये करण्यात आले असून, त्याची दुखापत खूप गंभीर असल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे तो 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही.
आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहे. यापूर्वी असे म्हटले जात होते की तो विश्वचषकातील पहिले काही सामने खेळू शकणार नाही, परंतु आता असे दिसते आहे की त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल आणि असे झाल्यास बाबर आझमच्या अडचणी वाढू शकतात. कारण पाकिस्तानच्या मुख्य वेगवान गोलंदाजीमध्ये नसीम शाहचा समावेश होतो.
चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली
जमान खानला मिळू शकते संधी
नसीम शाह केवळ एकदिवसीय विश्वचषक 2023 मधूनच नाही तर त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तसेच पाकिस्तान सुपर लीगमधूनही बाहेर असू शकतो. नसीम शाह एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जमान खानचा पाकिस्तान संघात समावेश केला जाऊ शकतो. या युवा खेळाडूला आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते.