Download App

World Cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानची ‘झेप’; गतविजेता संघ तळाला

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाची (AFG vs PAK) धूळ चारली. पाकिस्तानसाठा हा पराभव लाजिरवाणा ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने झुंजार खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या विजयाबरोबरच गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा संI पाचव्या क्रमांकावर असला तरी अफगाणिस्तानने मोठी झेप घेत सहावा क्रमांक गाठली आहे. या स्पर्धेतील संघाची सुरुवात चांगली राहिली होती. नंतर मात्र संघ ढेपाळला.  पाकिस्तानचे सलग तीन पराभव झाले आहेत. आता यातून विजयी मार्गावर परतणे पाकिस्तानसाठी कठीण झाले आहे.

World Cup 2023 : अफगाणिस्तानचा आणखी एक उलटफेर; पाकिस्तानला दणका, 8 गडी राखून विजय

रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने आणखी एक उलटफेर केला. अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 8 विकेट राखून धूळ चारली. चेन्नईमध्ये काल पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने 283 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंड संघाचा पराभव केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 284 धावांच्या धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या प्लेयरने खराब फिल्डिंग केली. सोपे झेल सोडले, त्यामुळे अफगाणिस्तान संघाने सहज विजय मिळवला.

अफगाणिस्तानच्या डावात गुरबाज 65, जादरन 87 धावांचे योगदान दिले. तर रहमत शाहने नाबाद 77 धावांची मॅचविनिंग खेळी केली. सोबतच कर्णधार शाहीदीनेही नाबाद 44 धावांचे संघाला योगदान दिले.अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. या विश्वचषक स्पर्धेतला हा अफगाणिस्तान संघाचा दुसरा मोठा विजय मानला जात आहे.

World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह

गतविजेत्या इंग्लंडचं काही खरं नाही 

मागील विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा संघ यंदा मात्र पूर्ण ढेपाळला आहे. स्पर्धेत इंग्लिश संघाने तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल कठीण झाली आहे. गुणतालिकेतही हा संघ तळाला गेला आहे. भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Tags

follow us