Download App

Video : चॅंपियन होताच पीचवरील माती का चाखली? रोहितने PM मोदींसमोर केला खुलासा…

चॅंपियन होताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली? याबाबत रोहित शर्माने पंतप्रधान मोदींसमोर खुलासा केलायं.

Image Credit: Letsupp

Captain Rohit Sharma : टी20 विश्वचषकावर (T20 World Cup) भारतीय संघाने नाव कोरलंयं. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचं काल मुंंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनीही संघासोबत मनमोकळ्या गप्पा मारत अप्रत्यक्षपणे मुलाखत घेतलीयं. या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला देत भावनिक प्रश्न विचारल्याचं दिसून आलं. यावेळी बोलताना संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्डकप जिंकताच पीचवरील माती चाखल्याबद्दल भाष्य केलंय. जिथं विजय मिळाला तो क्षण नेहमीच लक्षात ठेवण्यासाठी पीचवरील माती चाखल्याचं रोहितने सांगितलंय.

रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला, जिथं विजय मिळाला, तो एक क्षण मला नेहमी लक्षात ठेवायचा होता. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर मी पीचची माती चाखली होती. याआधी भारतीय संघ विश्वचषकाच्या जवळ पोहोचायचा मात्र, आपण जिंकू शकलो नाही. यावेळी भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंच्या अथक परिश्रमाने विश्वचषक जिंकू शकलोयं, विश्वचषक जिंकल्यानंतर त्या क्षणाला माझ्याकडून स्पीचवरील माती चाखण्याचं घडून गेलं असल्याचा खुलासा रोहित शर्माने केलायं.

राज्यातले प्रकल्प पळाल्याचे फेक नरेटिव्ह पसरवू नका; अजितदादांची विरोधकांना तंबी

तसेच विश्वचषक घेण्यासाठी रोहित शर्माने अनोख्या पद्धतीने नृत्य करत विश्वचषक हातात घेतल्याचं दिसून आलं होतं. त्यावरही रोहितने भाष्य केलं असून रोहित म्हणाला, आम्ही सर्वजण या क्षणाचे वाट पाहत होतो. या क्षणाला काही तरी वेगळं करण्याबाबतचं सहकाऱ्यांनी आधीच सांगितलेलं होतं. त्यामुळे मी कप घेण्यासाठी गेलो तेव्हा नृत्य सादर करत गेलो असल्याचं रोहित शर्माने सांगितलंय.

दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरातून संघावर शुभेच्छांसह कौतूकाचा वर्षाव करण्यात आलायं. पंतप्रधान मोदींनीही भारतीय संघाचं मनभरुन कौतूक केलंय. संघातील खेळाडूंशी गप्पा मारल्याचा व्हिडिओ मोदींनी आपल्या एक्स हॅंडलवरुन शेअर करत ” आमच्या T20 वर्ल्ड 🏏 चॅम्पियन्सनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्याशी छान संवाद झाला” असं कॅप्शन दिलंय. तसेच भारताला भारतीय संघाने विजय तर दिलाच आहे पण अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शनही करु शकतो, संघाकडे तो अधिकार असल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलंय.

follow us

वेब स्टोरीज