Download App

राम शिंदेंची सभापतीपदी वर्णी? ‘माधव’ मतांसाठी भाजपची दुसरी मोठी खेळी

विधान परिषद सभापती पदावर भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde), महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा पराभव झाला. ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा (Maratha) वादात भाजपला बसलेला हा मोठा धक्का होता. माधव अर्थात माळी, धनगर आणि वंजारी हे भाजपचे प्रमुख आणि पारंपरिक मतदार होय. याच समाजातील बडे नेते अशी ओळख असलेल्या मुंडे आणि जानकरांचा पराभव भाजपला विचार करायला लावणारा होता. या निकालानंतर भाजपचे नेते खबडून जागे झाले. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करुन एकापाठोपाठ एक ‘माधव’ नेत्यांचे पुनर्वसन करण्याची मोहीमच भाजपच्या नेत्यांनी हाती घेतली. (strong discussion going on about the nomination of Ram Shinde from the BJP for the post of Legislative Council Speaker.)

यात पंकजा मुंडे आणि भाजपच्या ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली. पंकजा मुंडे यांचे मंत्रि‍पदासाठीही नाव चर्चेत आहे. तर महादेव जानकर यांना राज्यसभेचे आश्वासन दिले. त्यानंतर आता राम शिंदे यांनाही बड्या पदावर बसवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. नेमके हे बडे पद कोणते आहे आणि राम शिंदे यांना ताकद देण्याचे आणखी काही कारण आहे का हेच आपण समजून घेऊ.

Worli Hit And Run प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; म्हणाले, काही धनदांडगे,राजकारणी…

दोन वर्षांपूर्वी रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत संपल्याने विधान परिषदेचे सभापती पद रिक्त झाले होते. त्यानंतर राजकीय फुटीने या पदाची निवडणूक झाली नाही. याच सभापतिपदासाठी या आठवड्यात निवडणुकीची शक्यता आहे. एक तर महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असून राज्यात सत्ताबदल झाला तरी विधानपरिषदेत आपले वर्चस्व कायम रहावे यादृष्टीने सभापतिपदाची घेण्याची रणनीती महायुती सरकारने आखली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे या पदावर भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. राम शिंदे हे धनगर समाजातील बडे नेते समजले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते. फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. शिंदे यांच्या रुपाने आगामी विधानसभा निवडणुकीत धनगर मतांची बेगमी करता येऊ शकते, असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे.

“पेपरलीक झाला हे सत्य, फायदा घेणारे मुन्नाभाई शोधा”; NEET वादात सुप्रीम कोर्टही कठोर

राम शिंदे यांचा गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला. पण भाजपने लगेचच त्यांची परिषदेवर वर्णी लावली. आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना अहमदनगरमध्ये विजय मिळाला. यात रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेडमधूनही लंके यांनी आघाडी घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना थांबवायचे असल्यास शिंदेंना ताकद देणे भाजपसाठी गरजेचे आहे. शिंदे यांच्याशिवाय प्रवीण दरेकर व निरंजन डावखरे यांचीही नावे चर्चेत आहेत. पण वर सांगितलेली सगळी रणनीती डोळ्यासमोर ठेवून भाजप शिंदे यांनाच संधी देण्याची शक्यता अधिक आहे.

विधान परिषदेतील संख्याबळ कसे आहे?

सध्या विधान परिषदेत 28 जागा रिक्त आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे 15, राज्यपाल नियुक्त 12 आणि एक अशा 28 जागा रिक्त आहेत. उर्वरित 50 मध्ये महायुतीचे 29 आमदार आहेत. यात भाजपचे 19, राष्ट्रवादीचे पाच, शिवसेनेचे चार आणि रासपच्या एका आमदाराचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे 21 आमदारांचे संख्याबळ आहे. यात काँग्रेसचे आठ, शिवसेना (उबाठा) सहा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तीन अपक्ष तीन आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार आहे.

follow us