Antim Panghal: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) 53 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी अंतिम पंघाल (Antim Panghal) सध्या अडचणीत सापडली. अंतिम पंघालच्या पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आता अंतिमवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं.
Paris Olympics : कुस्तीपटू अमन सेहरावतनं मैदान मारलं; भारत आणखी एका पदकाच्या जवळ
यामागे तिच्या बहिणीचं कारण आहे. कॅम्पसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने अॅक्रिडिटेशन कार्डचा वापर करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला पकडले. इतकेच नाही तर निशा पंघालला काही काळ ताब्यातही घेण्यात आले होते. नंतर या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) हस्तक्षेप केल्यानंतर तिला इशारा देऊन सोडून देण्यात आले. या घटनेनंतर आता अंतिम पंघालवर ऑलिम्पिक दरम्यान अनुशासन भंग केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तीन वर्षांची बंदी घातल्याची माहिती आहे.
Wrestler Antim Panghal to be banned for three years by IOA for indiscipline during Olympic Games: Source in Indian contingent pic.twitter.com/fgFhBP2U9B
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2024
…काही विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतायत; आंबेडकरांच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना खरमरीत टोला
बुधवार 7 ऑगस्टचा दिवस अंतिम पंघालसाठी खराब राहिला. या दिवशी 53 किलो कुस्ती चॅम्प डे मार्स एरिना प्रकारात पहिल्याच टप्प्यात तिचा पराभव झाला. मिळालेल्या माहितीनुसार अंतिम पंघाल तिचे प्रशिक्षक आणि स्पॅरिंग पार्टनरला भेटायला गेली होती. अॅक्रिडिटेशन कार्डचा वापर करून पॅरिस गेम्स व्हिलेजमधून सामान घेऊन जा असे तिने बहिण निशाला सांगितले होते. पण पुढे सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. फ्रेंच सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाचा आरोपही केला होता. नंतर या प्रकाराची भारतीय ऑलिम्पिक संघाने गंभीर दखल घेतली. कुस्तीपटू अंतिम पंघाल, बहिण निशा पंघाल आणि कोच या सगळ्यांची रवानगी भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अंतिम पंघाल, तिचा सपोर्ट स्टाफ आणि तिच्या बहिणीवर हद्दपारीची कारवाई होऊ शकते.
अंतिमने 2023 आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. अंतिम अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिलीच खेळाडू आहे. तिने 2023 मध्ये आशियाई स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल होते.