Download App

आयपीएल वर्ल्डकपपेक्षाही कठीण; हिटमॅन रोहितच्या बचावासाठी मैदानात उतरला क्रिकेटचा दादा

  • Written By: Last Updated:

Sourav Ganguly On Rohit Sharma :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भारताचा हा चौथा पराभव होता तर, WTC मधील सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर चाहत्यांकडून भारतीय संघासह कर्णधार रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यानंतर आता क्रिकेटचा दाद म्हणजेच सौरव गांगुली हिटमॅन रोहित शर्माच्या बचावासाठी मौदानात उतरला आहे. मात्र, गांगुलीने बचावासाठी केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर गांगुली नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. (ipl is more difficult than world cup)

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

काय म्हणाला सौरव गांगुली

गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रोहितला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु, कर्णधार म्हणून सलग दुसर्‍यांदा अपयशी ठरल्यानंतर बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने अनोखे विधान करत रोहितचा बचाव केला आहे, या विधानामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला

रोहितवर विश्वास 
रोहितचा बचाव करताना गांगुली म्हणाला की, माझा रोहितवर पूर्ण विश्वास असल्याचं गांगुली म्हणाला. रोहितने आणि धोनीने 5 आयपीएल जिंकली असून, आयपीएल जिंकणे सोपे नाही ही एक कठीण स्पर्धा आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे कठीण असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. आयपीएलमध्ये 14 सामने जिंकल्यानंतर एखादा संघ प्लेऑफमध्ये पोहोचतो. मात्र, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त 4-5 सामने खेळावे लागतात तर, आयपीएलमध्ये चॅम्पियन होण्यासाठी 17 सामने खेळावे लागतात असे गांगुली म्हणाला.

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

Tags

follow us