‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला

‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला

Shivsena Advertisement : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असला तरी विरोधक मात्र दाद द्यायला तयार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पुन्हा जोरदार हल्ला चढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (mahesh Tapase) यांनी एका वाक्याचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिंदे सेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘शिंदे सेनेची आजची जाहिरात पाहिल्यानंतर दिल्लीश्वरांनी नक्कीच त्यांना प्यार की झप्पी दिल्याचे जाणवते.’ असे ट्विट तपासे यांनी केले आहे.

जाहिरात आजची 

दरम्यान, आज प्रकाशित झालेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच या जाहिरातीत भाजप-शिवसेना युतीला 49.3 टक्के जनतेला कौल असल्याचं दर्शवण्यात आले आहे. विरोधकांच्या टक्केवारीत फूट करून आकडेवारी सादर करण्यात आली आहे. राज्यात प्रमुख विरोधक 26.8 टक्के असून अन्य 23.9 टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जाहिरात कालची अन् पेटला वाद 

कालच्या जाहिरातीत मात्र एका सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. काल यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं होतं.

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली.  विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. या घडामोडींनंतर फडणवीस यांनी कालचा ठरलेला कोल्हापूर दौरा सुद्धा रद्द केला होता. त्यानंतर आज एसटी महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासही फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचे कळते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube