Download App

Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले

Year Ender 2023: हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी धमाकेदार ठरले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, अॅशेस आणि नंतर आशिया कपपासून (Asia Cup 2023) वर्ल्ड कपपर्यंत (World Cup 2023) एकामागून एक अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या वर्षात क्रिकेटशी संबंधित काही नवीन नियमही आले, ज्यामुळे क्रिकेट आणखी रोमांचक झाला आहे.

इम्पॅक्ट प्लेयर: बीसीसीआयने यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू केला. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान या नियमाची चाचणी घेण्यात आली होती. आयपीएलमध्ये हा नियम लागू झाल्यानंतर जगभरातील अनेक लीगमध्ये हे दिसून आले. या नियमानुसार, संघ 11 ऐवजी 12 खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो. याचा अर्थ असा की तो त्याच्या खेळाडूंपैकी एकाच्या जागी दुसर्‍या खेळाडूला मधे एकदा बदलू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम अद्याप लागू झालेला नाही.

Year Ender 2023: भारताने मैदान गाजवले, आशियाई क्रीडा स्पर्धेत गाठली नवीन उंची

सॉफ्ट सिग्नल: अंपायरिंग नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला. फील्ड अंपायरकडून थर्ड अंपायरला दिलेला सॉफ्ट सिग्नल आयसीसीने काढून टाकला. पूर्वी मैदानात एखादा खेळाडू झेलबाद झाला आणि पंच त्यावर निर्णय घेऊ शकला नाही, तर तो सॉफ्ट सिग्नल देऊन थर्ड अंपायरची मदत मागायचा. या काळात तिसर्‍या पंचालाही निर्णय घेता आला नाही, तर तो निर्णय सॉफ्ट सिग्नल दिला जात होता. आता फील्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज नाही, फक्त थर्ड अंपायर यावर निर्णय घेतात.

अनलिमिटेड सुपर ओव्हर: T-20 क्रिकेटप्रमाणे या वर्षापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनलिमिटेड सुपर ओव्हरचा नियम लागू करण्यात आला आहे. म्हणजेच, जर सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर देखील टाय झाला, तर रिझल्ट घोषित होईपर्यंत सुपर ओव्हर खेळल्या जातील.

Year Ender 2023 : वर्षभरात सर्वाधिक गोलंंदाजी करणारे 5 गोलंदाज; न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचा दबदबा !

टाइम आऊट: आयसीसीने गोलंदाजांसाठीही टाईम आऊटचा नियम बनवला आहे. यामध्ये एक षटक संपल्यानंतर आणि पुढच्या षटकाच्या सुरुवातीच्या दरम्यान 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ निघून गेल्यास दोनदा इशारा दिला जाईल परंतु तिसर्‍यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड देण्यात येईल. त्यानुसार फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त 5 धावा मिळतील. सध्या हा नियम फक्त एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्येच लागू आहे.

follow us