Download App

क्रिकेटमध्ये खळबळ! अंमली पदार्थ सेवनाचा आरोप खरा ठरला; झिम्बाब्वेच्या ‘या’ 2 खेळाडूंवर बंदी

Zimbabwe Cricket News : क्रिकेटजगतातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. मागील महिन्यात झिम्बाब्वेचे (Zimbabwe Cricket) खेळाडू वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर या दोन्ही खेळाडूंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता या दोघांनवरही बंदी घालण्यात आली आहे. आता हे दोन्ही खेळाडू चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीत.

या दोन्ही खेळाडूंची शिस्तपालन समितीनेही चौकशी केली होती. त्यात या दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे मान्य केले होते. यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. डिसेंबर महिन्यात त्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोघेही पॉजिटिव आढळून आले होते. यानंतर प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर या खेळाडूंवर चार महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

जानेवारीपासूनच या कारवाईची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दोघांच्या पगारातही 50 टक्के कपात होईल. अंमली पदार्थ सेवनाच्या प्रकरणात आम्ही झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहोत. आता या दोन्ही खेळाडूंनी ही घातक सवय सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कृत्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला आहे. समितीने या गोष्टींचा विचार केला आणि त्यांना चार महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

झिम्बाब्वेचा आणखी एक खेळाडू केविन कासुझा यालाही सुनावणीपर्यंत क्रिकेट खेळण्यावर बंदी आणली आहे. मागील आठवड्यात इन हाउस डोप चाचणीतही नापास झाला होता. या प्रकरणात आता बोर्डाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्य आरोपासह शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. त्यावर सुनावणी घेऊनच शिस्तपालन समिती निर्णय घेईल.

पॅलेस्टाईनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयसीसीला नडला! भारतीय वीरांनो, तुम्ही कोणासाठी बोलणार का?

follow us