AUS vs PAK ODI and T20I series: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर (AUS vs PAK) केलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि T20I मालिकेसाठी संघाची घोषणा केलीय. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही मालिकेसाठी अजून कर्णधार निश्चित झालेला (ODI series and T20I series) नाही. पाकिस्तान 4 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला असला तरी कर्णधार कोण होणार? याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही. पीसीबीने कर्णधाराशिवाय दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर (AUS vs PAK ODI and T20I series) केलाय. पीसीबीने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांना एकदिवसीय मालिकेत किंवा टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही.
IND vs NZ : टीम इंडियाला धक्का अन् न्यूझीलंडने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानचा T20 संघ : अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हरिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), जहंदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफयान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान
🚨 Announcing Pakistan’s squads for the Australia and Zimbabwe tours 🚨
Read more ➡️ https://t.co/vzc7iFBINJ#AUSvPAK | #ZIMvPAK pic.twitter.com/l66VW259EA
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ: आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सॅम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी
महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य, गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास; एस. जयशंकर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ : अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम, उस्मान खान.
पाकिस्तानचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक :
4 नोव्हेंबर: पहिली एकदिवसीय, मेलबर्न
8 नोव्हेंबर: दुसरी एकदिवसीय, ॲडलेड
10 नोव्हेंबर: तिसरी एकदिवसीय, पर्थ
14 नोव्हेंबर: 1ली T20, ब्रिस्बेन
16 नोव्हेंबर: दुसरी T20, सिडनी
18 नोव्हेंबर: तिसरी T20, होबार्ट
पाकिस्तानचे झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक
24 नोव्हेंबर – 1ली एकदिवसीय, बुलावायो
26 नोव्हेंबर – दुसरी एकदिवसीय, बुलावायो
28 नोव्हेंबर – तिसरी एकदिवसीय, बुलावायो
1 डिसेंबर – 1ली T20, बुलावायो
3 डिसेंबर – 2रा T20, बुलावायो
5 डिसेंबर – 3रा T20, बुलावायो 5 डिसेंबर – 3रा T20