Download App

लोकसभेला भाजपच्या नेत्यांनी प्रणिती शिंदेंना मदत केली; सुशीलकुमार शिदेंचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला - सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेत्यांनीही प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मतदान केले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी यांनी केला. कॉंग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे शिदेंनी मतदान करणारे ते भाजप नेते कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

पराभवाचा वचपा दणकात काढला ! भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय 

लोकसभा निवडणुकीत मतदार जनतेने निवडून दिल्याबद्दल तसेच मविआच्या घटक पक्षांनी साथ दिल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदेंकडून मतदारसंघात ठिकठिकाणी कृतज्ञता मेळावे घेतले जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज अक्कलकोट रोडवरील राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलतांना शिंदेंनी हे विधान केलं. ते म्हणाले, मी आतापर्यंत 9 ते 10 निवडणुका लढवल्या आहेत. यंदाची निवडणूक आमच्यासाठी खूप सोपी होती. मला सर्वात कमी त्रास या निवडणुकीत झाला. विरोधी पक्षाचे लोक निवडणुकीत पैसै वाटप करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला त्यांची पर्वा नव्हती. कारण जनता आमच्यासोबत होती, असं ते म्हणाले.

खूशखबर! वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा 

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मी त्या सर्वांना धन्यावाद देतो, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे याचं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापवणारे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना लोकसभेला मदत केली, अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे. भाजपमध्येही आता एकमेकांकडे संशयाने पाहिले जात आहे.

राम सातपुतेंचा 74 हजार मतांनी पराभव…
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते रिंगणात होते. या दोन्ही नेत्यामध्ये कॉंटे की टक्कर झाली. त्यात प्रणिती शिंदेंनी 74 हजार मतांनी राम सातपुतेंचा पराभव केला. तब्बल 10 वर्षानंतर सोलापूरमध्ये कॉंग्रेस जिंकली.

 

 

 

follow us

वेब स्टोरीज