Double Murder In Shirdi : शिर्डीमध्ये एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. त्यामुळे शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान या हत्याकांडातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरू आहे.
उत्पादन खर्च कमी होणार, शेतकऱ्यांचे येणार ‘अच्छे दिन’, सरकार करणार कृषी क्षेत्रात एआयचा वापर
या हत्याकांडातील आरोपी किरण सदाफुले याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरा आरोपी राजू माळीचा शोध सुरू आहे. हे प्रकरण साई संस्थानचे (Sai Sansthan) दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घोडे हे मंदिरातील साई मंदिरातील कर्मचारी आहेत.
अहिल्यानगरची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी; रोहित पवारांचा सवाल
ते ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
एका जत्रेत देव म्हातारा होत नाही; कुस्ती संघाच्या कार्याध्यक्षांनी राक्षेला सल्ला देत टोचले कान
दरम्यान घटनेची माहिती मिळतात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिलेत. यावेळी त्यांनी सांगितलं की, शिर्डीमध्ये बाहेरचे गुन्हेगारी करणारे लोक येऊन अशा घटना करतात. कारण शिर्डीमध्ये जेवण फुकट मिळते, तसेच राहण्याची सोयसुद्धा कमी खर्चामध्ये होत असते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये घेऊन अशा घटना करत असतात. नशा करण्यासाठी वेगवेगळे प्रकार वापरतात. त्यामध्ये आयोडेक्स, व्हाईटनर इत्यादी कमी पैशात उपलब्ध होणारे साधनांमध्ये ते नशा करत असतात, त्याच नशेतून हा खून झाल्याचं असल्याचं डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलंय.