Download App

उत्पादन खर्च कमी होणार, शेतकऱ्यांचे येणार ‘अच्छे दिन’, सरकार करणार कृषी क्षेत्रात एआयचा वापर

Ajit Pawar : कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एआयचा (AI) वापर करण्याचा विचार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एआयचा (AI) वापर करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एआयचा मोठा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत आज बैठक घेतली. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश या बैठकीत दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

तसेच येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणं, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचं तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं तसंच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणं शक्य होणार आहे असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

एआय कुठे वापरला जाईल?

अजित पवार म्हणाले की, पीक स्थिती, मातीतील कार्बन पातळी आणि मातीची स्थिती यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर एआय वापरून लक्ष ठेवता येत असल्याने, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण कृषी क्षेत्रात प्रायोगिकरित्या त्याचा वापर करू शकतो. तसेच हा बदल शेतकऱ्यांसाठी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चांगला असला पाहिजे. असं अजित पवार म्हणाले.

महायुतीमध्ये धुसफूस, कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी, नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, एआय जगभरातील क्षेत्रात क्रांती घडवत आहे आणि शेतीला मागे ठेवू नये. येत्या काळात, बदलते हवामान, अवकाळी पाऊस, कीटकांचे हल्ले आणि कामगारांची कमतरता यासारख्या आव्हानांना तोंड देत असताना, शेतकऱ्यांसाठी एआय अपरिहार्य ठरेल. उत्पादन खर्च कमी करताना उत्पादकता वाढविण्यात एआय महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.

follow us