मोठी बातमी, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन
Gajanan Mehendale Passes Away : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे आज (17 सप्टेंबर) सायंकाळी निधन झाले.

Gajanan Mehendale Passes Away : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे आज (17 सप्टेंबर) सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (गुरुवार) सकाळी 11 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी गजानन मेहेंदळे (Gajanan Mehendale Passes Away) मोडी लिपी, तसेच फारसी, उर्दू, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा शिकली होती. त्यांनी तीस वर्षे या विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर श्री राजा शिवछत्रपती हा मराठी ग्रंथ व Shivaji His Life and Times हा इंग्लिश ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी श्री राजा शिवछत्रपती हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखानवधापर्यंत माहिती देतो तर ‘Shivaji His Life and Times’ हा ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो.
इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. 1971 च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता. त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.
Video : मोठी बातमी, दिशा पटानी घरावर गोळीबार प्रकरणात दोन आरोपींचा एन्काउंटर