Download App

Beed News : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमावी, मुंडेंची मागणी

आमदार धनंजय मुंडेंनी बीडमधील झालेल्या विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाप्रकणी एसआयटी (SIT) स्थापन करावी, अशी मागणी केली.

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : बीड (Beed) शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील (Umakiran Educational Complex) कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आक्रमक झालेत. या  अत्याचार प्रकणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करावी, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

रस्ते, मेट्रो अन् सिंचन योजनांसाठी विधीमंडळात 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर 

मुंडे यांनी पीडितेच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल केला. या प्रकरणातील आरोप विजय पवार याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता. आरोपी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे साटेलोटे असून त्यांचे संबंध नेमके काय हे समोर येण गरजेचं आहे. हे दोघेसोबत का होते? त्यामागील कारण काय? हे पोलीस तपासात आलं पाहिजे. त्यासाठी आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढावेत, अशी मागणी मुंडेंनी केली आहे. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हिंदी सक्तीचा दिल्लीचा आदेश घाबरून मागे घेतला; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला 

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, आरोपी पवारने पैशांच्या दबावाने अनेक छोटे क्लासेस बंद केले. त्याने नेत्यांसोबत आपले फोटो पोस्ट करून राजकीय दबाव निर्माण केला, असंही ते म्हणाले.

तर ही अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना असून शिक्षणांचे कृत्य गंभीर स्वरुपाचे आहे. विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपींविरुध्द कठोर आणि कडक कारवाई करा, असं पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

अशा वृत्तीला ठेचून काढले पाहिजे
मी मुद्द्यांचे भांडवल किंवा देखावा करत नाही. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, हेच माझे कर्तव्य आहे. जिथे अन्याय असेल तिथे मी उभा राहीन. मग तो कोणीही असो, अशा वृत्तीला ठेचून काढले पाहिजे, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.

प्रकरण काय?
तीन दिवसांपूर्वी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शिक्षकांनी एका 17 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित शिक्षकांनी पीडित विद्यार्थिनीला केबिनमध्ये एकटीला बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. या प्रकरणात, सफारी कारमधून पळून जाताना दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

follow us