Download App

हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री, 28 नोव्हेंबरला घेणार शपथ

Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.

  • Written By: Last Updated:

Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे. माहितीनुसार, हेमंत सोरेन (Hemant Soren) 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आज त्यांनी त्यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या (India Alliance) आमदारांची बैठक घेतली.

या बैठकीमध्ये हेमंत सोरेन यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. माहितीनुसार, 28 नोव्हेंबरला हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, आज आम्ही विद्यमान सरकारचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. असं त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 81 पैकी 56 जागा जिंकल्या आहे. सोरेन यांनी भाजपच्या गमालीएल हेम्ब्रोम यांचा 39,791 मतांनी पराभव करून बारहेत जागा राखली. सोरेन यांना 95,612 मते मिळाली, तर हेमब्रोम यांना 55,821 मते मिळाली.

राज्यात महायुतीची लाट; शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीसाठी राज्यसभेचे दार बंद?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीत 4:1 च्या फॉर्म्युल्यावर सरकार स्थापन होऊ शकते. झारखंडमध्ये काँग्रेसचे 16 आमदार विजयी झाले असल्याने पक्षाला आपल्या चार आमदारांना मंत्रिपद मिळावे अशी इच्छा आहे. दरम्यान, काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Virat Kohli ने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

follow us