रणजितसिंह मोहितेंनी भाजप विरोधात काम केले, त्यांची हकालपट्टी करा, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
रणजितसिंह मोहितेंनी भाजप विरोधात काम केले, त्यांची हकालपट्टी करा, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

Ram Satpute : भाजप उमेदवार राम सातपुतेंचा (Ram Satpute) माळशिरस मतदारसंघातून (Malshiras constituency) निसटता पराभव झाला. शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी 13 हजार 148 मताधिक्याने राम सातपुतेंचा पराभव केला. या पराभवाचे खापर त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांवर (Ranjitsinh Mohite Patil) फोडले. रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही सातपुते यांनी केली आहे.

निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मराठे फॅक्टरमुळेच 204 आमदार… 

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, असा आरोपही सातपुतेंनी केला.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकर यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या विरोधात निवडणुक लढवली होती. या चुरशीच्या निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव झाला. यानंतर राम सातपुते यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली, त्यात ते म्हणाले की, माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले, असा आरोप राम सातपुते यांनी केला.

Virat Kohli ने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम 

पुढं त्यांनी लिहिलं की, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी, असी मागणी सातपुते यांनी केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना 1 लाख 21 हजार 713 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राम सातपुते यांना 1 लाख 08 हजार 566 मते मिळाली. विजयाचे अंतर केवळ 13 हजार 148 मतांचे आहे. यात मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. त्याच मोहिते पाटलांवर सातपुते यांनी हल्लाबोल केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube