Share Market Update : भारतीय बेंचमार्क इंडेक्स कमजोरीसह काल बंद झाले. निफ्टी 24,800 च्या खाली गेला. सत्राअखेर सेन्सेक्स 638.45 अंकांनी अर्थात 0.78 अंकांनी घसरून 81,050.00 वर आणि निफ्टी 218.80 अंकांनी (Share Market) म्हणजेच 0.87 टक्क्यांनी घसरला आणि 24,795.80 वर बंद झाला.
आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणतात की सोमवारी बाजारात रोलर कोस्टर राईड पाहायला मिळाली. मजबूत सुरुवातीनंतर, निर्देशांक उंचावर गेला परंतु मिड आणि स्मॉलकॅप विभागात विक्री सुरू ठेवली. हे असंच चालू राहिलं आणि शेवटी निफ्टीने 25,000 चा मानसशास्त्रीय आधारही गमावला. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, बँकिंग काउंटरमध्ये तीव्र वसुली दिसून आली. पण त्यानंतर ही रिकव्हरी संपली आणि 24,795.75 वर बंद झाला.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
अदानी पोर्ट (ADANIPORTS)
बीइएल (BEL)
अदानी एन्टर (ADANIENT )
कोल इंडिया (COALINDIA)
एनटीपीसी (NTPC)
आयडीया (IDEA)
फेडरल बँक (FEDERALBNK)
हिंदुस्तान पेट्रोलियम (HINDPETRO)
युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)
वॉल्टस (VOLTAS)
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हरियाणात पिक्चर अभी बाकी है! सुरुवातीच्या पिछेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का