Stock Market: शेअर बाजाराची आज जोरदार सुरुवात; सेन्सेक्सने 400 अंकांनी वर, तर निफ्टीही तेजीत

Stock Market: शेअर बाजाराची आज जोरदार सुरुवात; सेन्सेक्सने 400 अंकांनी वर, तर निफ्टीही तेजीत

Share Market Today :  आज सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये निर्देशांकांवर व्यवहाराची जोरदार सुरुवात झाली आहे. उघडल्यानंतर सेन्सेक्स 400 अंकांनी वर होता. देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार विक्रीनंतर या आठवड्यात दिलासा मिळण्याची आशा आहे.

Rain Update: राज्यात आजपासून परतीच्या पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसणार

निफ्टी 100 अंकांपर्यंत वाढ नोंदवत होता. सेन्सेक्स 82,068 च्या आसपास होता. निफ्टी 25,125 च्या आसपास धावत होता. निफ्टी बँकेतही 300 हून अधिक अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 51,770 च्या वर होता. मिडकॅप 320 अंकांच्या आसपास आणि स्मॉलकॅपने 130 अंकांच्या आसपास वाढ नोंदवली.

शेअर बाजाराची काय स्थिती?

भारतीय शेअर बाजारातील मुंबई शेअर बाजाराची 400 अंकांच्या वाढीने सुरुवात झाली होती. तर निफ्टीनेदेखील 100 अंकांच्या वाढीसह आजच्या सत्राला सुरुवात केली. आज निफ्टी बँकेचा निर्देशांकदेखील 300 अंकांनी वाढला होता. सध्या निफ्टीचा निर्देशांक 225.40 अंकांच्या घसरणीसह 24789.20 अंकांपर्यंत घसरला आहे. तर दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकात 662.31 अंकांची घसरण झाली आहे. सध्या सेन्सेक्स 81026.14 अंकांवर आहे.

दोन-तीन दिवसांत देणार बम्पर रिटर्न्स?

मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने डॉ. लाल पॅथ लॅब्स या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत हा शेअर चांगला परतावा देईल, अशी शक्यता या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. मोतीलाल ओस्वालने या स्टॉकला दोन ते तीन दिवसांसाठी टेक्निकल पिक म्हटलं आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 3655 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे मोतीलाल ओस्वालने सूचवले आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3495 रुपयांवर बंद झाला होता. आगामी दोन ते तीन दिवसांत हा शेअर 5 ते 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मोतिलाल ओस्वालने व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube