टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेतील संबंध ताणलेले; ‘त्या’ अधिकाऱ्यांसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन

ट्रम्प प्रशासनातील व्यवस्थापन आणि संसाधने विभागातील उपसचिव जॉर्ज डब्ल्यू. गोर आणि मायकेल जे. रिगास यांच्यासोबत गोर देखील भारत दौऱ्यावर आहेत.

Trumpp

Trumpp

भारत-अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. (Trump) गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला असून दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद आहे. भारतातील नवीन अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अद्याप पदभार अजून स्वीकारला नाही. ते सध्या भारत दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, भारताच्या दौऱ्यावर पाठवण्याअगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर या अधिकाऱ्यांना भारताच्या दौऱ्यावर पाठवले.

ट्रम्प प्रशासनातील व्यवस्थापन आणि संसाधने विभागातील उपसचिव जॉर्ज डब्ल्यू. गोर आणि मायकेल जे. रिगास यांच्यासोबत गोर देखील भारत दौऱ्यावर आहेत. 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर ते भारतात असतील. विशेष म्हणजे यादरम्यान ते भारत सरकारच्या विविध मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर देखील यादरम्यान चर्चा होईल. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांना भारताच्या दौऱ्यावर पाठवण्याअगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर या अधिकाऱ्यांना भारताच्या दौऱ्यावर पाठवले.

Nobel Prize : डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं; मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना पाठवल्याचे बोलले जाते. भारत-अमेरिका व्यापार करारवर चर्चा होण्याचे संकेत आहेत. भारत अमेरिका संबंधांमध्ये कदाचित पहिल्यांदाच एखाद्या राजदूताने पदभार स्वीकारण्यापूर्वी देशाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असावी. टॅरिफ, H-1B व्हिसाच्या मुद्द्यात भारत अमेरिकेचे संबंध खराब झाली असून व्यापार चर्चा पूर्णपणे बंद आहे. पूर्वीप्रमाणे व्यापार करार व्हावेत, याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने म्हटले की, व्यापार करारासाठी भारताकडून आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. गोर यांची भारतातील राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्याच्या अगोदरच गोर हे भारत दाैऱ्यावर आलेत. भारत-अमेरिकेत नेमका कोणता महत्वाचा करार होतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या जवळ रशिया आणि चीन आले आहेत. शिवाय रशिया भारताला अत्यंत कमी भावात कच्चे तेल देखील देत आहे.

Exit mobile version