Download App

शरद पवार अन् अजितदादा कशासाठी भेटले? संजय राऊतांनी ‘रोखठोक’मधून सांगितलं कारण

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुण्यातील भेटीची चर्चा संपता संपत नाही. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी खुलासा केल्यानंतरही राजकारणात चर्चा सुरूच आहेत. आता सामनाच्या ‘रोखठोक’मध्ये या भेटीचे आणखी एक कारण सांगण्यात आले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचा विषय आता मागे टाकायला हवा. दोन नेत्यांमधील राजकीय भेट नसावी. शरद पवार यांनी राज्यात अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या आहेत. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रात त्या काम करतात. या संस्थांवर पवारांनी अजित पवार यांना बसवले. मात्र पक्षफुटीनंतर आता पुढे काय, हा प्रश्न आहे. पवार असतानाच अजित पवारांनी त्यांच्या पक्षावरच दावा सांगितला तेथे या संस्थांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Mahadev Jankar : जानकरांना ‘चूक’ उमगली, भाजपला बाजूला ठेवत आखला नवा प्लॅन!

अजित पवारांनी नवा पक्ष काढावा

शरद पवार -अजित पवार यांच्या भेटीचा विषय मागे पडला आहे. तो मागे पडणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. अजित पवार यांना स्वबळावर स्वतःचे मोठेपण सिद्ध करायचे आहे तरच ते नेते ठरतील. त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुका लढवाव्यात. भाजपाच्या मदतीने जे शिंद्यांनी केलं तेच अजित पवार करणार असतील तर त्यांचे राजकारण वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळेल. कारण, राजकारणात बुरुजांना महत्व आहेच. वाळूच्या किल्ल्यांना नाही. महाराष्ट्रातील राजकारण सध्या तसेच चालले आहे, असा दावा राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे.

अजित पवार हे राजकारणातले बलवान नेते आहेत. पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठिशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. अजित पवार यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. आजच्या शिखरावर नेऊन बसवले, असे राऊत या लेखात म्हणतात.

भाजपचा आजवरचा यूएसपी निव्वळ कंपार्टमेंट अॅण्ड हेट पॉलिटिक्स; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचेच आहे

मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास अजित पवार उपस्थित राहिले नाहीत.अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचेच आहे व फडणवीस यांना मानणाऱ्या भाजप आमदारांना शिंदे यांचे ओझे झाले आहे. शिंदे यांच्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रात अतोनात नुकसान सुरू आहे, असे सांगणारी शिष्टमंडळे दिल्लीत अमित शाहांना भेटतात. महाराष्ट्रात बदल होतील असे त्या मंडळांना सांगण्यात येते. त्यामुळे मु्ख्यमंत्रीपदी 2024 नंतरही आपणच असणार असे अमित शाहांचे वचन असल्याचे शिंदे सांगतात. ते काही खरे नाही. वचन पाळायचेच होते तर अजित पवारांचा घोडा रिंगणात आणलाच नसता. महाराष्ट्रातले राजकारण हेलकावे खात आहे व त्या अस्थिरतेचा फायदा दिल्लीला घ्यायचा आहे.

Tags

follow us