भाजपचा आजवरचा यूएसपी निव्वळ कंपार्टमेंट अॅण्ड हेट पॉलिटिक्स; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

भाजपचा आजवरचा यूएसपी निव्वळ कंपार्टमेंट अॅण्ड हेट पॉलिटिक्स; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

Sushma Andhare on BJP : दंगल भडकावल्याशिवाय भाजप (BJP) सत्तेत येऊ शकत नाही. आता सत्ता मिळणार नाही हे लक्षात आल्यानं भापप २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक गोध्रा हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे. जानेवारीत अयोध्येत रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमालात लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. या कारसेवकांच्या करवी ते दंगल घडवून आणतील. यात कारसेवकांचा जीव गेला तरी त्याची पर्वा भाजपला नसेल. आणि त्याच भरवशोवर ते सत्ता हस्तगत करतील, असं धक्कादायक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar ) यांनी केलं. यावर आता उबाठाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, वडेट्टीवार जे बोलत आहेत, त्यात फार फार वेगळे असायचं काही कारण नाही. एकूणच, भाजपचा आजवरचा यूएसपी हा निव्वळ कंपार्टमेंट अॅण्ड हेट पॉलिटिक्स करणं हाच राहिला आहे. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने दंगली घडवणं हेच ते आजवर करत आले आहेत. निवडणुका जवळ आल्या की आणखी दंगली उसळतात, असेही अंधारे यांनी म्हटलं.

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचा ‘शुभंकर’ लॉन्च 

सामनातून फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ते आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलत संपली. मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केल्याची टीका करण्यात आली. या टीकेनंतर भापजकडून जोरदार टीका करण्यात आली. यावर अंधारे म्हणाल्या की, संजय राऊत जे लिहितात, ते त्यांच्यापर्यंत पोहोचंत, याचा आनंद आहे. खरं बोलल्यावर सख्या आईला राग येतो, त्यामुळं भापज जर चिडली असले तर आम्हाला आनंद आहे.

दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंच्या गुप्त भेटीविषयी विचारलं असता अंधारे म्हणाल्या की, कदाचित दादा भुसेंना आमच्याकडे यावं वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. ते माझे भाऊ आहेत. मी कधीही ते माझे शत्रू आहेत, असं म्हटलं नाही. माझ्या भावांना चुकलं असं म्हणावसं वाटत असेल तर चांगलचं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही, या छगन भुजबळांच्या वक्तव्यावर बोलतांना अंधारे म्हणाल्या, भुजबळाचं एकूण पिंड जो आहे आयडॉलॉजिकल तो पिंड फार महत्त्वाचा आहे.. माणूस कुठेही असला तरी त्याचा पिंड सुटत नसतो. भुजबळांचा स्टॅन्ड भिडेंच्या अटकेच्या कारवाईबद्दल आग्राही असला पाहिजे. आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जाप सुद्धा विचारला पाहिजे कारण ते सत्तेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube