Download App

मोदी तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले समर्थक खासदारांचे पत्र

एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.

Narendra Modi Claim Govt Establishment : लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Results) जाहीर झाले असून यंदा भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. तरीदेखील एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.

‘मराठ्यांना चुनाच लावायचे काम शरद पवारांनी केले पण चुना लावणारा माणूस…’, सदाभाऊ खोतांची टीका 

बहुमत मिळवल्यानंतर एनडीएच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित भाजप, एनडीएचे नेते आणि नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केले.

विधानसभेच्या जागेवरून नगरमध्ये युतीला तडे? भाजपच्या ‘त्या’ दाव्याने राष्ट्रवादीची कोंडी 

यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की, मला सांगायला अभिमान वाटतो की एनडीए ही सर्वात यशस्वी आघाडी आहे. एनडीएने 30 वर्षांत प्रत्येकी पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांवर टीका केली. सध्य ईव्हीएम जिवंत आहे का? मेले, यावेळी ईव्हीएमची विरोधक अर्थी काढतील, असं वाटलं होतं. मात्र चार तारखेनंतर त्यांच्या तोंडाला कुलूप लागले, अशी टीका मोदींनी केली.

दरम्यान, एनडीएच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पोहोचून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या समर्थक खासदारांचे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द केले आहे.

मोदी कधी शपथ घेणार?
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. र. शपथविधी सोहळ्याची तारीखही निश्चित करण्यात आली असून मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

दिल्लीत आज भाजपची बैठक
भाजपने आज दिल्लीत आपल्या सगळ्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभववावर चिंतन केले जाणार असल्याची माहिती आहे. यंदा भाजपला उत्तर प्रदेशातून केवळ 33 जागा मिळाल्या. हा भाजपपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशा स्थितीत भाजप उत्तर प्रदेशातील संघटनेबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

follow us