पराभवाच्या भीतीने मोदींकडून धार्मिकतेवर लोकांना भडकावणं सुरू; कॉंग्रेसचं टीकास्त्र

पराभवाच्या भीतीने मोदींकडून धार्मिकतेवर लोकांना भडकावणं सुरू; कॉंग्रेसचं टीकास्त्र

Ramesh Chennithala Criticize PM Modi : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला ( Ramesh Chennithala ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) व भाजपवर ( BJP ) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आपली खुर्ची जाणार या भितीने मोदी धार्मित तेढ वाढवून लोकांना भडकावण्याचे काम करत आहेत. चेन्नीथला हे मुंबईतील टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

सुप्रिया सुळेंचं ‘एक’ मत वाढणार : शरद पवार 10 वर्षांनंतर पुन्हा झाले बारामतीचे मतदार

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भितीने नरेंद्र मोदी हिंदु-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा करत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महिला राजकारणात कमीच पण, भारतात ‘या’ महिलांच्या नावावर जिंकण्याचं अनोखं रेकॉर्ड…

ते पुढे म्हणाले की, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने १० वर्षात काहीही काम केले नाही. आता लोकांना सांगण्यासारखे काही नसल्याने मोदी धार्मित तेढ वाढवण्याची भाषा करत आहेत. दक्षिण भारत वेगळा देश करण्याची मागणी केली जात असल्याचे पंतप्रधान जाहीरपणे सांगतात, अशी मागणी कोणीही केलेली नाही, मग मोदींना हे कोणी सांगितले? ते केवळ लोकांना भडकावण्याचे काम करत आहेत परंतु जनतेवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलही नरेंद्र मोदी खालच्या पातळीवरची भाषा बोलत आहेत.

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल मोदींनी वापरलेली भाषा चुकीची असून पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभत नाही. जनतेचा मोदी सरकारवर विश्वास राहिला नसून काँग्रेसच्या जाहिरनाम्याला जनतेचे समर्थन मिळत आहे. काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात दिलेल्या गॅरंटीवर जनता विश्वास व्यक्त करत आहे. देशभरात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण असून लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube