PM Modi यांची अहमदनगरमधील सभा पुढे ढकलली, ‘या’ दिवशी होणार सभा; विखेंची माहिती

PM Modi यांची अहमदनगरमधील सभा पुढे ढकलली, ‘या’ दिवशी होणार सभा; विखेंची माहिती

PM Modi campaign meeting for Sujay Vikhe in Ahmednagar Postponed : अहमदनगर ( Ahmednagar ) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या प्रचारासाठी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) हे मैदानात उतरले आहे. विखेंच्या प्रचारासाठी मोदी 6 मे रोजी नगरमध्ये सभा घेणार होते. मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. अशी महिती स्वतः सुजय विखे यांनी दिली.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येणार?

विखे म्हणाले की, अहमदनगरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. ही सभा अगोदर 6 मे रोजी होणार होती. मात्र आज सकाळीच फोन आला की, मोदी यांचा महाराष्ट्राचा दौरा हा सहा तारखे ऐवजी सात तारखेला होणार आहे. त्यामुळे ही सभा सहा तारखे ऐवजी सात तारखेला संध्याकाळी 4.30 वाजता होणार आहे. मोदी नगरमध्ये येण्याची हा चौथी वेळ आहे. गेल्यावेळी ते आले तेव्हा हे अहमनगर होतं. आता अहिल्यानगर हे नाव बदलणं प्रस्तावित आहे. त्यामुळे यावेळी देखील नेहमीप्रमाणे त्यांच्यासभेनंतर वातावरण एका मिनिटांत बदलून जाईल. असं विखे म्हणाले.

ज्ञानमंदिर शाळेला मिळाली स्कूलबस; इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

दरम्यान विखे यांच्या उमेदवारी अर्ज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता खुद्द मोदी नगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने विखेंना मोठे पाठबळ मिळणार आहे. मोदी नगर जिल्हा दौऱ्यावर असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांकडून जयत तयारी करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून तसेच लोकप्रतिनिधीं कडून संबंधित सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. तसेच मोदी नगर जिल्ह्यात येणार असल्याने भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मोठी तयारी देखील सुरू आहे. दरम्यान मोदींची सभा सुजय विखे यांना विजय मिळवून देणार का हे त्या काळात स्पष्ट होईलच.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज