Prajwal Revanna : देशाच्या राजकारणात चर्चेत असणारे JDS चे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांना आज (शुक्रवारी) SIT ने अटक केली आहे. त्यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
आज जर्मनीहून आल्यानंतर त्यांना केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर SIT ने अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर कर्नाटक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 6 जूनपर्यंत एसआयटी कोठडी दिली आहे. त्यापूर्वी प्रज्वलच्या रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि हृदयासह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
काही दिवसापूर्वी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता त्याची चौकशी एसआयटी करत आहे. बेंगळुरूला पोहोचण्यापूर्वी प्रज्वल रेवन्ना यांनी अटक टाळण्यासाठी जमिनीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. रेवन्ना यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल आहेत, तर त्यांच्या आईने कथित अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मागितला आहे.
प्रज्वलशी संबंधित प्रकरणात त्यांची आई आरोपी नसली तरी एसआयटीला या प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी करायची आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या मतदारसंघात मतदान केल्यानंतर प्रज्वल 27 एप्रिल रोजी जर्मनीला गेला होता.
रोहित शर्मा देणार पांड्याला धक्का, प्लेइंग 11 मध्ये खेळणार ‘हा’ स्टार खेळाडू
सीबीआय मार्फत केलेल्या एसआयटीच्या विनंतीनंतर इंटरपोलने प्रज्वलच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. प्रज्वलने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगून हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.