Sharad Pawar Speak : उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हिंडेनबर्ग अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. या अहवालाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आले असता पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहितीही नाही. एक परदेशातील कंपनी काही तरी अहवाल बनवते व त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, हे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अदानी व हिंडेनबर्ग अहवालावर आपली मत व्यक्त केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहिती नाही. मला एवढेच माहिती आहे की ती एक परदेशातील कंपनी असून काही तरी अहवाल बनविण्याचे काम करते. मात्र त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. पंरतु हे काही योग्य नाही. अशा अहवालाकडे किती लक्ष द्यायचे, याचाही विचार केला गेला पाहीजे. एखाद्या संस्थेने आपल्या देशातील उद्योगाबद्दल सांगण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने त्याविषयी सांगणे अधिक योग्य व विश्वासार्ह आहे. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
Ajit Pawar : …म्हणून नॉट रिचेबल, अजित पवारांनी स्वत: सांगितलं कारण
अदानींचे योगदान मान्य करावे लागेल
पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी अदानी व अंबानी यांच्यावर देखील भाष्य केले. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक विजेचा पुरवठा हा अदानीं समूहाच्या कंपनीकडूनच होतो आहे. पंरतु याबाबत मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान हे मान्य करावे लागेल.
गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून रेड सिग्नल… गौतमी म्हणाली, मी पुन्हा येईन
या पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असत. मात्र, नंतर ज्येष्ठ उद्योगपती टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.