Praniti Shinde : भाजप (BJP) सरकारचा जो कारभार सुरू आहे. त्याबाबत जनताही आता शहाणी होत आहे. त्यामुळेच तर खोके सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सगळ्या मंत्रिमंडळाने पैशांचा वापर आणि प्रचार यंत्रणा राबविल्यानंतरही त्यांना पुण्यातील कसबा (kasba Bypoll) मतदारसंघात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा जनाधार घटत चालला आहे. त्यामुळेच हे सरकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली.
सोलापूर (Solapur) शहरातील स्वागत रोड परिसरात आयोजित हाथ से हाथ जोडो उपक्रम बैठक तसेच कर्तुत्ववान महिलांचा सन्मान आणि ई-श्रम कार्ड वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचा : रोहित पवार पोरकट : लोकसभेच्या जागेवरुन आमदार प्रणिती शिंदेंनी सुनावलं
शिंदे पुढे म्हणाल्या, की भाजप सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नोटबंदी आणि जीएसटीच्या (GST) निर्णयांमुळे उद्योग धंदे बंद पडत चालले आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात काँग्रेस (Congress) पक्ष आणि विरोधक संघर्ष करत आहेत.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने पैशांचा वापर केला. जोरदार प्रचार केला. तरी देखील या निवडणुकीत पराभव झाला. इतर ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या आहेत, असा दावा आ. शिंदे यांनी केला.
Rohit Pawar म्हणाले, प्रणिती शिंदे मोठ्या बहिणीसारख्या
यावेळी आमदार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, की देशात लोकशाही आहे. लोकांची शाही म्हणजे लोकशाही. इथे कोणत्याही पंतप्रधानाची हुकुमशाही नाही, असे आमदार शिंदे म्हणाल्या.