Rohit Pawar म्हणाले, प्रणिती शिंदे मोठ्या बहिणीसारख्या…

Rohit Pawar म्हणाले, प्रणिती शिंदे मोठ्या बहिणीसारख्या…

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी जमिनीवर राहणारा साधा कार्यकर्ता आहे, म्हणून मला कदाचित त्या ओळखत नसतील. विषय ओळखण्याचा आणि न ओळखण्याचा नाही. प्रणिती शिंदे या अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्या बोलून गेल्या; त्यांना तो अधिकारही आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रीया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांना विनंती एवढीच की, एकमेंकात भांडण करण्यापेक्षा आपला विरोधी पक्ष हा भाजपा आहे. तसेच, बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha)जागेवरून काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादीत (NCP)काँग्रेसमध्ये जुंपल्याची पाहायला मिळतेय. या जागेवर काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलं. यावरून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde)रोहित पवारांना (Rohit Pawar)प्रत्युत्तर दिलं होतं. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तू-तू-मै-मै रंगल्याची पाहायला मिळतेय.

रोहित पवारांच्या या वक्तव्याबद्दल विचारलं असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, कोण रोहित पवार? त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अजून ते मॅच्युअर नाहीत, त्यांना वेळ द्या. काही लोकांत पोरकटपणा असतो, असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं होतं.

Kasba Chinchwad By Election : एक्झ‍िट पोलवर निवडणूक आयोगाकडून बंदी

सोलापूरला गेल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका माध्यमांसमोर व्यक्त केली. सोलापूर लोकसभेची जागा, कोणाला मिळेल, याचा निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील. पण, पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेताना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं. मग तो निर्णय काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने असेल, असंही रोहित पवारांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube