Download App

Turkey : ‘काश्मीरचा प्रश्न सोडवा’; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं संयुक्त राष्ट्रात मोठं विधान…

Turkey : भारत-कॅनडामध्ये(India-Canada) तणावाची परिस्थिती असताना आणखी एका देशाने भारतावविरोधात हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत तुर्कीचे(Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्दोगन(Recep Tayyip Erdoğan) यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरुन भारताविरोधात आवाज उठवल्याचं समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Canada News : हा तर निर्लज्ज अन् वेडगळपणा; अमेरिकेतील तज्ज्ञांनी ट्रुडोंना फटकारलं

जम्मू-काश्मीवरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार युद्ध झाल्याचा इतिहास आहे, त्यावरुन आशियामध्ये विकासाठी काश्मीरमध्ये शांतता असली पाहिजे असं मत रेसेप एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत मांडलं आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानची या प्रश्नावर चर्चा सुरु राहिली तरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

तुर्कीने याआधी भारताविरोधात भूमिका घेतल्याचा इतिहास आहे, याआधी तुर्कीने पाकिस्तानच्या पक्षात अनेकदा मत व्यक्त केले आहेत, आत्ताही तुर्कीने अशा पद्धतीने मत व्यक्त करुन पुन्हा एकदा भारताविरोधात भूमिका घेऊन डिवचल्याचं दिसून येत आहे.

Sanjay Raut : प्रफुल्ल पटेलांचा पक्ष कोणता? राऊतांनी दिलं खोचक उत्तर

नूकतीच भारतात जी-20 परिषदेसाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्दोगन उपस्थित राहिले होते. जी-20 परिषदेनंतर रेसेप तेय्यप यांनी भारताविरोधात भूमिका घेत आपले रंग दाखवले आहेत. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आपली भूमिका मांडली आहे. त्यावरुन भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली असून आमची भूमिका ठाम असून देशांतर्गत प्रश्नांवर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

एर्दोगन म्हणाले :
काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही पाऊलं उचलले जातील, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल.काश्मिर प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून हा प्रश्न सोडवायला हवा.

जी 20 परिषदेतून कॅनडात परतलेल्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताविरोधात कारवायांचे सत्र सुरुच ठेवले आहे. खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या सरकारने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. जस्टीन ट्रुडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील जम्मू काश्मीर या राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला या अ‍ॅडव्हाजरीत देण्यात आला आहे.

बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी; अनेकांच्या भुवया उंचावल्या…

सुरक्षेच्या कारणांमुळे कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. आ भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे, असे या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे. मात्र यामध्ये केंद्रशासित प्रदेश लद्दाखचा उल्लेख केलेला नाही. कॅनडाच्या नागरिकांनी इशान्य भारतातील मणिपूर, आसाम या राज्यांतही जाऊ नये असे कॅनडा सरकारने म्हटले आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात असलेल्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे.

Tags

follow us