Download App

फडणवीसांचा अजित पवारांना धक्का! कॉंग्रेससह राष्ट्रवादीचा माजी आमदारही भाजपमध्ये जाणार जाणार

Ex MLA भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

Two Ex MLA will enter in BJP from Congress and NCP of Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण या दोनही पक्षांचे माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. कोण आहेत हे आमदार? त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार जाणून घ्या…

‘हे’ दोन माजी आमदार भाजपमध्ये जाणार

उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये धुळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. उद्या 1 जुलै 2025 रोजी हा पक्ष प्रवेश पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचा दिवस खास मात्र ‘या’ राशीच्या लोकांसाठी मात्र रेड अलर्ट! जाणून घ्या…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. दुसरीकडे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यात अद्याप स्वतंत्र लढणार की, युती आणि आघाडी होणार हे देखईल स्पष्ट झालेलं नसल्याने अशा पक्षप्रवेशांचा धडाका भाजपसह इतर पक्षांनी देखील लावल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us