Download App

World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ ठरला; कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या…

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून(PCB) पाकिस्तान संघाची(Pakistan Team) घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह(Nasim Shah) दुखापत झाल्याच्या कारणामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होता, नसीम शाहच्या जागी हसन अलीचा(Hussan Ali) समावेश करण्यात आला होता.

‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले

पाकिस्तानचा संघ :
बाबर आझम (कर्णधार), इमाम उल हक, फखर जमान, अब्दुल्ला शफीक, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, शादाब खान, मोहम्मद नवाज, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, वसीम जूनियर आणि उसामा मीर.

Supriya Sule : मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, वाचा नक्की काय घडलं?

बाबर आझम(Babar Aazam) पाकिस्तान संघाचं नेतृत्व करणार असून विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघाचे फलंदाज म्हणून बाबर आझम, फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि सलमान आगा असणार आहे. तसेच तरुण खेळाडूंमध्ये मोहम्मद हॅरिस आणि सौद शकीलचा समावेश आहे.

Sai Pallavi Wedding: अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? ‘तो’ फोटो व्हायरल

पाकिस्तानकडे शादाब खान आणि मोहम्मद नवाज हे दोन प्रमुख फिरकी अष्टपैलू खेळाडू असून सलमान आगा आणि इफ्तिखार अहमदही फिरकीला मदत करणार आहेत. उसामा मीर हा आणखी एक लेग स्पिन पर्याय आहे त्याला पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी संधी दिली आहे.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर, दोन खासदारांनी केलं विरोधात मतदान, ‘ते’ दोन खासदार कोण?

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी करणार आहे. त्याला हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि हसन अली यांची साथ मिळणार आहे. आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात नसीम शाहला दुखापत झाली होती. पुढील काही महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानने नुकत्याच आशिया चषक स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. विश्वचषकात पाकिस्तान संघ दोन सराव सामने खेळणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा सराव सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. यानंतर पाकिस्तान 6 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये नेदरलँडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

Tags

follow us