Supriya Sule : मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, वाचा नक्की काय घडलं?

Supriya Sule : मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, वाचा नक्की काय घडलं?

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेमध्ये आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women’s Reservation Bill) चर्चा सुरू होती. कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या त्यावेळी हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला.

India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! महिंद्राचा कॅनडातील व्यवसाय बंद

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 (Women’s Reservation Bill) लोकसभेत बहुमताने मंजूर झालं आहे.

भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर होणं बाकी आहे. दरम्यान त्यावर लोकसभेत चर्चा सुरू असताना कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या त्यावेळी भाजप खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मैत्रिण असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं.

मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या

ते घडलं असं की, कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या. त्यावेळी भाजप खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील यावेळी आपल्याला बोलू द्यावं असं म्हणज होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्यासाठी सभागृहात आवाज उठवला. सुळे म्हणाल्या की, त्यांनी अद्याप भाषण सुरू देखील केले नाही. तरी देखील गोंधळ केला जात आहे. त्यानंतर अध्यक्षांच्या आदेशाने हा गोंधळ थांबला आणि कानिमोझी करूणानिधी या त्यांचे भाषण विना अडथळा करू शकल्या. अशा प्रकारे सुळे यांनी लोकसभेमध्ये आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube