Download App

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 चे रणशिंग फुंकले, ‘हा अहंकारी आघाडीसाठी धडा’

Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या बंपर विजयाचा भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. सबका साथ, सबका विकास ही भावना कायम आहे. विकसित भारताची हाक जिंकली आहे. वंचितांना प्राधान्य देण्याच्या विचाराचा विजय झाला आहे.

ते पुढं म्हणाले की भाजपने तीन राज्यांत विजय मिळवला आहे आणि तेलंगणातही पक्षाचा पाठिंबा सतत वाढत आहे. असा विश्वास आणि प्रेम भेटले की जनतेप्रती माझी जबाबदारी वाढते. मी माता-भगिनी, तरुण आणि शेतकरी यांच्यासमोर नतमस्तक आहे. या निवडणुकीत देशाला जातीजातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासाठी फक्त 4 जाती सर्वात मोठ्या जाती आहेत. या म्हणजे महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी शक्ती आणि गरीब कुटुंबे. या चार जातींना सत्ता देऊनच देशाचा विकास होईल.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर, उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव

आज प्रत्येक शेतकरी, आदिवासी आणि गरीब म्हणतो की ही निवडणूक कोणत्याही पक्षाने जिंकली नसून आपण जिंकली आहे. प्रत्येक महिला आणि शेतकरी तरुण या विजयाला आपले यश मानत आहे. मी विशेषत: स्त्री शक्तीचे अभिनंदन करेन. या निवडणुकीत महिला शक्तीचा निर्धार होता की भाजपचा झेंडा फडकवणार. देशातील महिला जर कोणाचे संरक्षण कवच बनल्या तर कोणतीही शक्ती त्यांचे नुकसान करू शकत नाही. नारी शक्ती वंदन कायद्याने देशातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. भाजप सरकारमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाचा वाटा आहे.

तेलंगणाच्या डीजीपींना रेवंत रेड्डींची भेट नडली, निवडणूक आयोगाने केलं निलंबित

पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसने कधीही आदिवासी समाजाला विचारले नाही. त्याचं आदिवासींनी काँग्रेसाचा पराभव केला. याचे उदाहरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पाहायला मिळते. आदिवासी समाजही विकासाकडे पाहतो आणि त्यांना विश्वास आहे की, केवळ भाजप सरकार हे करू शकते.

पीएम मोदी म्हणाले, भाजप सरकार केवळ धोरणेच बनवत नाही, तर ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल याचीही काळजी घेते. जिंकण्यासाठी मतदारांना भाषण आणि लालूच दाखवणे आवडत नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्पष्ट धोरण हवं. काही लोक म्हणत आहेत की या हॅट्ट्रिकमुळे 24 ची हॅट्ट्रिक निश्चित झाली आहे.

राजस्थानात भाजपचा विजय : रहाटकरांची रणनीती ठरली चर्चेची…

पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशात भाजपच्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला मोठा जनसमर्थन मिळत आहे. ज्या पक्षांना भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे राहण्यास लाज वाटत नाही, त्यांना हा स्पष्ट इशारा आहे. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी आणि तपास यंत्रणांची बदनामी करण्यासाठी युक्तिवाद केले जातात. हे निकाल म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यालाही पुष्टी देणारे आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हा काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीसाठीही धडा आहे.

follow us