Ajit Pawar Said R R Patil Sign On Irrigation File Scam : तासगावमध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar) उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आर आर पाटील (R R Patil) यांच्यावर मोठं वक्तव्य केलंय.
माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणाले याच्यावर 70 हजार कोटी रूपयाचा आरोप करू या. माझ्यावर आरोप झाला होता, तोपर्यंत 42 हजार कोटी रूपयांचा खर्च झाला (Irrigation File Scam) होता. यानंतर एक फाईल तयार झाली आणि गृहखात्याकडे गेली. त्यांनी अजित पवार यांची ओपन चौकशी करावी म्हणून सही केली होती, असं म्हणत त्यांनी आर आर पाटलांवर निशाणा साधलाय.
अजितदादांचा भाजपला धक्का; विरोध असतानाही नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर
तासगावमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मोठं भाष्य केलं. 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली (Assembly Election 2024) होती. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. त्यांनी माझी खुली चौकशी करावी, असं म्हणत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार जावून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतु त्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं गेलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी त्या फाईलवर सही केल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी, असे आदेश देत सही केल्याचं अजित पवार यांना दाखवलं. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून सहकार्य केलं. त्या आर. आर. पाटलांनीच माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथील सभेत बोलताना केलाय. आर आर पाटील यांनी राजीनामा देऊन थेट अंजनी गाठलं. राजीनाम्याची मला कल्पना देखील दिली नव्हती, अशी खदखद अजित पवार यांनी भरसभेत बोलून दाखवली आहे. संजय काका पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन अजित पवार यांनी त्यांच्या भाषणातून केलंय.