Nana Kate : राज्यात एकीककडे दिवाळीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नाना काटे (Nana Kate) रिंगणात आहेत. तर विरोधात महायुतीकडून भाजपचे शंकर जगताप हे रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मतदारसंघात दौरा करीत नाना काटे यांची भेट घेतलीयं. या भेटीमध्ये नाना काटेंना माघार घेण्याबाबत अजितदादाचं बोलणं झाल्याची चर्चा सुरु झालीयं. या चर्चेला खुद्द नाना काटेंनी पूर्णविराम देऊन टाकलायं. निवडणुकीतून माघारी घेण्याबाबत अजितदादांशी चर्चा झालेली नसून दादा माघार घेण्याबाबत म्हणाले तर त्यावेळेसचं पाहुनच निर्णय घेणार असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट केलंय.
भारत- चीनमधील तणाव संपला! दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई
पुढे बोलताना नाना काटे म्हणाले, अजित पवार यांनी आज दिवाळीनिमित्त फोन केला आणि भेटून गेले आहेत. या भेटीमध्ये मतदारसंघातील परिस्थितीबाबत चर्चा झाली असून निवडणुकीतून माघारी घेण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. यासोबतच मैत्रीपूर्ण लढतीबाबतही कसलीच चर्चा झालेली नाही. मी अजितदादांना मतदारसंघातील माहिती दिली. माघारी घेण्याबाबत अजितदादा म्हणाले तर त्यावेळेसच पाहुन निर्णय घेणार असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
‘दलित-मराठा-मुस्लिम समीकरण जुळलं तर…’, मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक
चिंचवड मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर यांनी बंडखोरी केलीयं. त्यांनी परिवर्तन विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज केला आहे. भोईर यांच्याबाबत सवाल केला असता, नाना काटे म्हणाले, भाऊसाहेब भोईर यांच्याशी माझी चर्चा भेट होत असते. भोईर हेदेखील निवडणूक लढवणार असून त्यांचं आणि माझं एकमत होणार असल्याचा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी गटनेते राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज भरलायं. यावेळी त्यांनी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. तर महायुतीकडून शंकर जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बंडखोरी करीत पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. तसेच, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून अर्ज भरला आहे. मंगळवारी 19 जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 32 जणांनी अर्ज भरले आहेत.