नाना काटेंनी घेतला आक्रमक पवित्रा; काही झालं तरी भाजपचं काम करणार नाही, जगतापांचं टेन्शन वाढलं
Maharashtra Assembly Election 2024 : काही झालं तरी भाजपचे काम करणार नाही. आमच्यापैकी मी किंवा कोणीही उभा राहिला तरी त्याचं काम करायचं आणि निवडून आणायचं, असं आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं ठरल आहे. त्यामुळे पुढे कोणीही उमेदवार असला तरी आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार, अस मत पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते नाना काटे यांनी लेट्सअप मराठी’शी बोलताना व्यक्त केलं आहे. नाना काटे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही अजित पवारांकडे चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सुटावी,अशी मागणी केली आहे. मात्र, तसं नाही झालं तरी एक वेगळा पर्याय देण्याचा आमचा विचार आहे. आमच्यापैकी कोणीही उभा राहिला तरी त्याला पाठिंबा द्यायचा, अस आमच ठरल आहे.
भाजपच काम करणार नाही
तुम्ही भाजपचे काम करणार नाही? असा प्रश्न विचारला असता, काटे म्हणाले की, शंभर टक्के खरं आहे. आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत मात्र वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी पोटनिवडणूक मी लढवली होती आणि यामध्ये मला जवळपास एक लाखापर्यंत मत होते. हे मत पाहता आम्ही आगामी निवडणूक भाजपच्या विरोधात लढणार असल्याचही काटे यांनी स्पष्ट केले. पारडं कुणाचा जड हा काही विषय नाही मतदार राजा आमच्या सोबत आहे. त्यामुळे उमेदवार कोणीही असो मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहे. शंकर जगताप उमेदवार असले तर मोठी टक्कर होईल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न विचारल्यानंतर काटे म्हणाले, असा मला काही वाटत नाही ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार आहे.
मशाल हातात घेणार?
राष्ट्रवादीला जागा नाही सुटली तर मशाल हाती घेणार की तुतारी वाजवणार? या प्रश्नावर काटे म्हणाले की, अजून असं काही आमचं ठरलं नाही, सध्या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या, ग्राम्सथांच्या गाठीभेटी घेणं सुरू आहे. आमचे सर्व सहकारी कामाला लागले आहेत. कॅम्पिंग सुरू झाल आहे. आमचे सर्वे एजन्सी फायनल झाले आहे. सध्या काही सांगता येत नाही योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईल, असं मत काटे यांनी व्यक्त केले.दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूती होती तरी देखील एक लाख मत घेतली यावेळी काय रणनीती असेल असे विचारले असता ते म्हणाले, पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूती होती तर मला एक लाख मत कसे मिळाले? कशा आर्थिक गोष्टी ओपन झाल्या यावेळी आम्ही याची काळजी घेऊ, असे प्रश्न उपस्थित करून काटेंनी आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांना खोचक टोला लगावला.
अजित पवारांनी ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली; दिपक चव्हाण तुतारी फुंकणार? नक्की काय घडलं
अजित दादांशी चिंचवडच्या जागे संदर्भात चर्चा झाली का? यावर ते म्हणाले, अजितदादांनी आम्हाला मतदारांच्या गाठीभेटी, लोकांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. आमची ज्यावेळेस वरिष्ठांशी जागे संदर्भात चर्चा होईल त्यावेळी चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील असं आश्वासन अजित पवारांनी आम्हाला दिल्याचेही काटे यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उघड भाजप विरोधात भूमिका घेत असून भाजपच्या विद्यमान आमदारा विरोधात निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. यावरून महायुतीमध्ये अलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होतंय तर दुसरीकडे नाना काटे यांनी पोटनिवडणुकीत सहानभूती असताना देखील जोरदार टक्कर देत एक लाख मते मिळवली होती. यावेळी अजित पवार हे महायुतीत गेल्याने ही जागा महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार भाजपला सुटेल अशी जास्त शक्यता आहे यामुळे नाना काटे यांची मात्र गोची झाली आहे.
वेट अँड वॉच
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटेल की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र होत असलेल्या चर्चा पाहता भोसरी आणि पिंपरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सुटतील आणि चिंचवड ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल, असं बोललं जात आहे. नेमकी हीच गोष्ट हेरून नाना काटे वेट अँड वॉचच्या भूमिकेत तर नाही ना? जागा कुणाला सुटते हे पाहून मशाल हाती घ्यायची की तुतारी वाजवायची हे नाना काटे स्पष्ट करतील, असही मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केल जात आहे. शेवटी जागा वाटपानंतर नाना काटे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.