नागपूर : मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आहेत. राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात, तर काही गोष्टी न सांगता करतात. फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे. मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या नव्या इंनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, वडेट्टीवारांच्या या कौतुकामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते नागपूर येथे बोलत होते.
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळेल का? वाचा, काय सांगतो नियम..
त्यांच्यावर बसलेला ठपका पुसून निघेल
वडेट्टीवार म्हणाले की, मध्यंतरी त्यांचे नाव ते बदला घेण्याचं राजकारण करतात असा ठपका होता, तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, मात्र वैयक्तिक वैरी नसावं, जो समज झाला होता तो समज ही पुसून निघेल, असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.
दिल्लीच्या बैठकीत मोठी खलबतं; 20 मिनिट चर्चा अन् शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी ठेवले मोठे प्रस्ताव
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांनी बॅकलॉक भरून काढावा, त्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया असेही वडेट्टीवर म्हणाले.
“काँग्रेस नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडला”, ठाकरेंच्या नेत्याचा काँग्रेसला आरसा
शिंदे उपमुख्यमंत्री पद नाही घेतलं तर दुसरा चेहरा आहे, त्यांची मजबुरी आहे. त्यांना पक्ष संभाळण्यासाठी त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी मंत्री पद घेतले, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 2029 मध्ये येथे दोन्ही चेहरे उपमुख्यमंत्री पदाचे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेत मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाहीत असेही वडेट्टीवार म्हणाले.