PM Modi On Congress : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना मोदींनी पुन्हा एकदा कलम 370 वरून काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. मात्र या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.
या सभेत मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर पुणे आणि भाजपचा नातं विचार आणि आस्थाचा नातं आहे. भाजपच्या विचारांचा पुण्याने नेहमी समर्थन केला आहे. पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच पुण्यासाठी महायुतीची सरकार अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच पुण्यातील पूर्व आणि पश्चिम आउटरींग रोडवर 40 हजार कोटींचा काम सुरु आहे तसेच खोपोली आणि खंडाळा मिसिंग लिंकसाठी देखील साडे सहा हजार कोटींचा काम होत आहे. महायुती सरकार राज्यात विकासकामांवर भर देत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केली.
तर कर्नाटकामध्ये काँग्रेसने खोटं बोलून मते घेतली. सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस जनतेला दिलेली गँरंटी पूर्ण करत नाही असं देखील मोदी म्हणाले. कर्नाटकामध्ये दररोज काहींना काही घोटाळे समोर येत आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेस जनतेला लुटत आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर केला.
तर जम्मू काश्मीरवरून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असं या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले.
अंबानींच्या लग्नात मोदी गेले होते, मी नाही कारण…, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
तर आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मात्र काँग्रेसने या मुद्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता पण आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. काँग्रेसकडून महाराष्ट्राचा अपमान करण्यात येत आहे. असा आरोप देखील नरेंद्र मोदींनी या सभेत बोलताना लावला.