अंबानींच्या लग्नात मोदी गेले होते, मी नाही कारण…, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Rahul Gandhi On PM Modi : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार देखील करताना दिसत

Rahul Gandhi On PM Modi : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार देखील करताना दिसत आहे. यातच आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांसाठी गोंदिया (Gondia) जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी संविधानाची प्रत दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशात लोकांना विभाजन करण्याचा आरोप लावला. महाराष्ट्रात काँग्रेसला गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम मिळत आहे. असं देखील राहुल गांधी म्हणाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी म्हणत आहे की आम्ही लाला रंगाची संविधानाची पुस्तक दाखवत आहे. मात्र या संविधानामध्ये शाहू, आंबेडकर तसेच गौतम बुद्ध यांच्या विचारांना स्थान देण्यात आले आहे. हे विचार हजारो वर्षांपूर्वीचे विचार आहेत. असं राहुल गांधी म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांनी जे विचार मांडले होते तेच विचार भारतीय संविधानात आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधान वाचलेच नाही. कारण त्यांनी संविधान वाचले असते, तर त्यात जे लिहिले आहे, त्याचा आदर केला असता. नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे लोक 24 तास संविधानावर आक्रमण करत आहेत. असं देखील राहुल गांधी म्हणाले. याच बरोबर आरएसएस आणि मोदींकडून संविधानाची हत्या करण्यात येत आहे. असा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी लावला.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राचा शेतकरी 24 तास कष्ट करत आहे मात्र आज सोयाबीन, कापसाला योग्य मिळत नाही. भाजप सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. तुम्ही जर शेतकऱ्यांचा फायदा केला असता, तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार रिलीज
तसेच अदाणी सारख्या उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज भाजप सरकारने माफ केले. पण नरेंद्र मोदी यांनी 10-12 वर्षांत किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले? असा सवाल देखील त्यांनी या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अंबानींच्या लग्नात नरेंद्र मोदी गेले होते. तिकडे राहुल गांधी गेला नाही. याचा अर्थ असा की मोदी त्यांचे आहे आणि मी तुमचा आहे. असं राहुल गांधी म्हणाले.