Manoj Jarange On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) कोणत्या मदारसंघातून उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच लेट्सअप मराठीशी (LetsUpp Marathi) बोलताना जरांगे पाटील यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार याबाबत मोठा खुलासा केला आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ज्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येणार त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार आहे असं ते म्हणाले.
बारामतीमध्ये उमेदवार देणार का? यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, बारामती महाराष्ट्रात येते आणि बारामती कोणी नावावर करून घेतलेली नाही. बारामती 288 विधानसभा मतदारसंघात येते आणि त्यामुळे आम्ही तिकडे देखील उमेदवार देणार असं जरांगे पाटील लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले. तसेच ज्या ठिकाणी उमेदवार जिंकून येणार नाही त्याठिकाणी त्यांचे उमेदवार पाडून टाकणार असेही ते म्हणाले.
या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल करत आम्ही आमची भूमिका बदलत नाही असं ते म्हणाले. आमची सुरुवातीपासून एकच भूमिका आहे ती म्हणजे मराठा आणि कुणबी एक आहे. त्यामुळे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही आमची मागणी आहे आणि ही मागणी सुरुवातीपासूनच आहे. असं जरांगे पाटील म्हणाले.
याच बरोबर या राज्यात एकाच जातीवर कोणीच जिंकू शकत नाही आणि जर मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले तर यांचा (महायुती) पराभव होणार असा विश्वास देखील या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा
तसेच लेट्सअप मराठीला दिलेल्या या स्फोटक मुलाखतीमध्ये मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मी समाजासाठी लढत आहे, मी स्वार्थी नाही असं जरांगे पाटील म्हणाले. समाजाचे कष्ट आणि योगदान मी माझ्या स्वार्थासाठी वापर करणार नाही. मी समाजाचे लेकरे मोठे करणार आणि जर मराठा, दलित आणि मुस्लिम समीकरण जुळले तर त्यांच्यासाठी सत्तेचा वापर करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.