निलंगा : माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) हे एक चारित्र्यसंपन्न, स्त्री शक्तीचा आदर करणारे,
नम्रतेने बोलणारे व विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजीरावांना मतदान करून निलंगा मतदारसंघाची अस्मिता जपावी, असे आवाहन औराद येथील डॉ. मलिकार्जुन शंकद स्वामी (Dr. Mallikarjuna Shankad Swamy) यांनी केले.
संभाजीराव पाटील निलंगेकरांना लाल दिवा पक्का, निलंगा मतदारसंघ राहणार जिल्ह्याच्या केंद्रस्थानी
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारसभेत डॉ.स्वामी बोलत होते. पुढे बोलताना डॉ. स्वामी म्हणाले की ,२०२४ मध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आपण भरघोस मताधिक्याने आशीर्वाद द्यावे. ते एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व आहेत. स्त्री शक्तीचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व असून सर्वसामान्यांना नम्रतेने बोलणारे नेतृत्व आहे.स माजातील सर्व समाज घटकांना घेऊन चालणारे, सर्वांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व आहे. केवळ निलंगा मतदारसंघ व जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचे नेतृत्व करणारे विकसनशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
मोठी बातमी! संभाजीराव पाटील निलंगेकर यांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठिंबा
डॉ. स्वामी म्हणाले की, मतदार संघातील जनतेला आपल्या परिवारातील एक घटक व आपले दैवत मानणारे व्यक्ती या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता सर्वांच्या सुख-दुःखात धावून येणारा माणूस म्हणून मतदारसंघात त्यांना पाहिले जाते. त्या तुलनेत विरोधक आपला कारभार लातूरमधील नेतृत्वाकडे कारभार सोपवणारा आहे. निलंगा मतदारसंघातील एक मतदार व कार्यकर्ता या नात्याने आपण सर्वांनी निलंग्याची अस्मिता जपू,असे ते म्हणाले.
संभाजीराव पाटील यांनी निलंगा मतदारसंघात व जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली आहेत. आपल्या भविष्याचा विचार करून योजना आणल्या आहेत. आ.संभाजीराव पाटील यांना निवडून देण्यासाठी २० तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही डॉ.मलिकार्जुन शंकद स्वामी यांनी केले.