सेम टू सेम! पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकाच नावाच्या उमेदवाराचे तीन अर्ज

पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाचे उमेदवार अश्विनी कदम यांच्या नावाचे तीन अर्ज दाखल झाले असल्याचं समोर आलंय.

Ahilyanagar Election

Ahilyanagar Election

Parvati Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Parvati Assembly Constituency) वातावरण तापले आहे. या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची थेट लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्यामुळं पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमदेवाराची डोकेदुखी वाढलीयं. राष्ट्रवादीच्या उमदेवार अश्विनी कदम (Ashwini kadam) यांच्या नावाने तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून तिन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वैध करण्यात आले आहेत.

31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, दिवाळी नेमकी कधी साजरी करायची? शंकराचार्यांनी स्पष्टच सांगितलं, घ्या जाणून

महाविकास आघाडीतील घटक पक्ष अश्विनी नितीन कदम यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर अश्विनी नितीन कदम नावाचे दोन उमेदवार तर अश्विनी अनिल कदम नावाचा एक उमेदवारी अर्ज दाखल झालायं. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता २२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील २० जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत, अशी माहिती पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात आली. या उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Video : अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला; फडणविसांनी नावं घेत सांगितलं

पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे उमेदवारी अर्जातील यादीनुसार दिसून आले. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भाजपच्या डोक्यात काय? शेलारांनी क्लिअर केलं

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया काल पार पडली. पक्षाकडून अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र त्यांच्या नावाशी मिळते-जुळते नाव असलेल्या अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना नावात काय आहे, याचा चांगलाच अनुभव येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल तर झालेत, मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी या अपक्ष उमेदवारांचे महत्व वाढणार असल्याचे बोलले जात आहे..

Exit mobile version