नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भाजपच्या डोक्यात काय? शेलारांनी क्लिअर केलं

नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भाजपच्या डोक्यात काय? शेलारांनी क्लिअर केलं

Nawab Malik News : भाजपने खुलेआम विरोध केला तरीही राष्ट्रवादीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना मानखुर्द मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलीयं. नवाब मलिक यांना महायुतीत सामिल करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शवला होता. तेव्हापासून ते आत्ताही भाजपकडून मलिकांना विरोधच होतोयं. आता नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं असलं तरीही भाजप मलिकांचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा भाजपचे नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी घेतलायं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे.

‘वनवास’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! नाना पाटेकर अन् उत्कर्षच्या भूमिकेनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट महायुतीत सामिल होत असतानाच नवाब मलिकांना विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर कट्टर विरोध दर्शवूनही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिलंय. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली असून महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केलीयं. भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नसल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलंय.

आई सांगते माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका तरी…अजित पवारांना अश्रू अनावर, युगेंद्र पवार काय म्हणाले?

सना मलिकांच्या उमेदवारीवर भाजपची भूमिका?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलीयं. याबाबत कोणताही पुरावा किंवा माहिती समोर आलेली येत नाही तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार याबाबत प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय.

शरद पवारांचं माढ्यात वेगळंच राजकारण; साखर कारखानदार अभिजित पाटील यांना उमेदवारी

दरम्यान, ज्यावेळी अजित पवार गटाने भाजपशी हातमिळवणी केली त्याचवेळी अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी पत्र पाठवून मलिकांना विरोध केला. मलिकांना सत्तेत घेतल्यास युती तुटू शकते असं फडणवीसांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता मलिक यांना भाजपकडून कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने या उमेदवारीला मूक संमती आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube